आज दिवसभरात... 3 जानेवारी 2019
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
ABP News Bureau Last Updated: 03 Jan 2019 11:32 AM
बैकग्राउंड
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचे गुरु आणि असंख्य नामवंत क्रिकेटपटू घडवणारे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचं बुधवारी (02 जानेवारी) मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने क्रिकेटचा महागुरु...More
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचे गुरु आणि असंख्य नामवंत क्रिकेटपटू घडवणारे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचं बुधवारी (02 जानेवारी) मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने क्रिकेटचा महागुरु हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. सचिन तेंडुलकर, अजित आगरकर, विनोद कांबळी, प्रवीण आमरे, चंद्रकांत पंडित यासारख्या क्रिकेटपटूंनी आचरेकर सरांकडून क्रिकेटचे धडे गिरवले होते. आज सकाळी दहा वाजता दादरच्या शिवाजी पार्कवरील स्मशानभूमीत रमाकांत आचरेकर यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, उड्डाणापूर्वीच बिघाड झाल्याचं उघड, नियोजित साताऱ्या दौऱ्याला विलंब