आज दिवसभरात... 8 फेब्रुवारी 2019

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

ABP News Bureau Last Updated: 08 Feb 2019 11:57 PM

बैकग्राउंड

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर1. देशात वायुसेना दुबळी करण्याची काँग्रेसची इच्छा, लोकसभेतील भाषणात मोदींचा काँग्रेसवर घणाघात, मोदींच्या आरोपांवर राहुल गांधींचंही प्रत्युत्तर2. राज्यातील मेगाभरतीच्या प्रक्रियेला सुरुवात, 4 हजार पदांसाठी...More

रविवारी मध्य रेल्वेच्या कल्याण-टिटवाळा दरम्यान दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याने मध्य रेल्वेने काही गाड्या रद्द केल्या आहेत. मनमाड येथून सुटणारी राज्यराणी, गोदावरी एक्सप्रेस तसेच जनशताब्दी एक्सप्रेस आणि भुसावळ-मुंबई पेसेंजर या गाड्या रद्द करण्यात आल्या असून नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस ही गाडी नाशिक पर्यंत जाऊन तेथून पुन्हा नागपूरकडे जाणार असल्याचे मध्य रेल्वे कडून कळविण्यात आले आहे.