LIVE UPDATE | मराठा आरक्षणाबाबत याचिकांवर अंतिम सुनावणी सुरु

दोन्ही सभागृहात मराठा समाजासाठी 16 टक्के आरक्षणाचा विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या विरोधात आणि समर्थनात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यावर आजपासून अंतिम सुनावणी सुरु होईल.

ABP News Bureau Last Updated: 06 Feb 2019 07:19 PM

बैकग्राउंड

मुंबई : मराठा आरक्षणा संदर्भात उच्च न्यायालयात दाखल विविध याचिकांवर आजपासून अंतिम सुनावणी सुरु होणार आहे. राज्य सरकारकडून ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी उच्च न्यायालयात बाजू मांडणार आहेत.मराठा आरक्षणाविषयी मागास प्रवर्ग...More

मराठा आरक्षण ही सरकारची निव्वळ राजकीय खेळी, विरोधकांचा हायकोर्टात दावा. मराठा जर कुणबी आहेत तर, त्यांना स्वतंत्र आरक्षण कशाला? कुणबी समाज हा ओबीसीत आहेच, याचिकाकर्त्यांचं मत, 50 टक्क्यांच्या वर 78 टक्क्यांपर्यंत आरक्षण देणाऱ्या राज्य सरकारच्या संविधानिक अधिकारावरही सवाल